थोरगव्हाण गावात तरूणाने घेतला टोकाचा निर्णय

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील थोरगव्हाण या गावात राहणाऱ्या एका  तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन केली आत्महत्या केली असुन ,या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , मच्छिंद्र विनोद पाटील , वय २१ वर्ष राहणार थोरगव्हाण या ठिकाणी दिनांक २४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपार २:५० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या कळीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . याबाबत गावातील पोलीस पाटीत गजानन नारायण चौधरी यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . तरूणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळु शकले नाही . मयत मच्छिंद्र पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांनी केले

 

Protected Content