यावल तालुक्यात ‘दहा दिवस गणिताचे’ उपक्रमास प्रतिसाद !

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात विविध शाळांमध्ये दहा दिवस गणिताचे हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून याला विद्यार्थ्याचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणी जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्या संकल्पनेतुन दहा दिवस गणिताचे हा उपक्रम राबविण्यात आला. या अनुषंगाने डायट चे प्राचार्यअनिल झोपे ,जिल्हा परिषदचे प्राथमिक चे शिक्षणाधिकारी विकास पाटील तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात दिनांक १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर असा दहा दिवस हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमात इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या वर्गाचे गणित विषयाचे गणन पूर्वतयारी, संख्याज्ञान, बेरीज-वजाबाकी, गुणाकार व भागाकार या क्रियांवर विविध उपक्रम राबवण्यात आले. सदर उपक्रमांमध्ये गणित पेटी, गणितीय खेळ व इतर ऍक्टिव्हिटीज घेऊन विद्यार्थ्यांचे गणिताची स्थिती सुधारण्यासाठी सदरचा उपक्रम तालुक्यात चांगल्या प्रकारे राबवण्यात आला.

या उपक्रमांतर्गत गणिताच्या मूलभूत क्षमता वाढण्यासाठी गणितातील विविध संबोध पक्के होण्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक यांनी मोठी मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे.

या उपक्रमाची सांगता गणिताची चाचणी घेऊन झाली. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त संकल्पनेतून डायटचे प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यावल यांच्या मार्गदर्शना खाली गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी यशस्वीरित्या राबवला आहे.

Protected Content