डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात स्पोर्ट्स सप्ताहास प्रारंभ

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते व डॉ. व्ही. एच. पाटील, प्राचार्य गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, गाडगे एस. जी., प्र.प्राचार्य डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, शफिक सर यांच्या उपस्थितीत स्पोर्ट्स विकचे उद्घाटन करण्यात आले.

 

पाच दिवशीय स्पोर्ट्स विकचे दि. १४ मार्च रोजी डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. या स्पोर्ट्स विकमध्ये  विद्यार्थ्यांचे बॉक्स क्रिकेट मॅच व बॅडमिंटन मॅचेस चे आयोजन करण्यात आले आहे. या विकचा समारोप दि. १९ मार्च रोजी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समवेत, शिक्षक कर्मचारी सायली बिर्ला, शैलेश नागला, विद्या बोरणारे, ऐश्वर्या आठवले, मनीषा इंगळे, विजय चौधरी, हर्षाली पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी अमोल चौधरी यांची उपस्थिती होती.

Protected Content