जिल्हावासीयांच्या जीवाची काहिली

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   आठवड्याच्या सुरुवातीलाच तापमानानाने उचल घेतली आहे. सोमवारी दिवसभरात ३९ अंशपर्यंत नोंद झाली असून वाढत्या तापमानामुळे जिल्हावासीयांच्या जीवाची काहिली झाली असल्याचे दिसून आले.

 

जिल्ह्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा वाढता आहे. गेल्या सप्ताहात ३२ ते ३५  अंशावर असलेल्या तापमानाने उचल घेतली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा चढता असून सोमवारी दिवसभरात ३८  अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून आगामी काळात लवकरच तापमान चाळीशीचा टप्पा पार करण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत. मंगळवार पासून तापमान ४० ते ४४ अंशपर्यंत चढेच राहणार असल्याचे वेलनेस वेदर फाऊंडेशनचे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी म्हटले आहे.

Protected Content