देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत सादर केला नवा ऑडीओ

मुंबई लाइव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यानंतर आजही विधानसभेत नवा नवा ऑडीओ बॉम्ब सादर केला आहे. या ऑडीओमध्ये डॉ.मुद्दस्सिर लांबे यांचे मो.अर्शद खान यांच्याशी आपले अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याचे संभाषण आहे.

राज्य सरकारने डॉ.मुद्दस्सिर लांबे यांना वक्फ बोर्डवरती घेतले आहे. या ऑडीओसोबतच डॉ. लांबे यांच्या विरोधात एका सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलेने बलात्काराची तक्रार केली असल्याचाही आरोप फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांनी संभाषणात आपले अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी असलेल्या संबंधाविषयी चर्चा केली आहे.

Protected Content