तापी पुर्णा वृत्तपत्र संघटनेच्या अध्यक्षपदी जीवन चौधरी तर सचिवपदी मकुंदा भार्गव यांची नियुक्ती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी पुर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटेनेच्या विभागाची बैठक यावल येथील बाल संस्कार विदया मंदिरच्या परिसरात महेश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीच्या अध्यक्ष्यस्थानी संजय निबाळकर होते. यावल येथे संपन्न झालेल्या बैठकीत तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात तालुक्याच्या वतीने निंभोरा तालुका रावेर येथील वृत्तपत्र विक्रेते प्रल्हाद महाजन यांची राज्य कार्यकारणीच्या सदस्य निवड करण्यात आली. या बैठकीची प्रस्तावना भालोद येथील खुषाल पाटील यांनी केली. प्रल्हाद महाजन यांनी महाराष्ट् राज्यवृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्याची माहिती दिली त्या नंतर तापी पुर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटणा सचिव उज्वल मराठे यांनी तापी पुर्णा कार्य व महत्व या बददल माहीती दिली तसेच यावल तालुक्यातील सभासद नोंदणीचे कार्य केले.

यावल येथील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते महेश वाणी यांनी यावल तालुका अध्यक्ष दहिगाव तालुका यावल येथील रहिवासी जेष्ठ वृत्तपत्र विक्रते जीवन मुरलीधर चौधरी, तालुका उपाध्यक्षपदी तुषार साळूंके व सचिव मकुंदा भार्गव यांची निवड जाहीर केली. कार्यकारणीत इतर पदधिकारी यांची ही निवड करण्यात आली. तापी पुर्णा संघटनेच्या पदधिकारी यांची सर्वानुमताने संस्थेचे अध्यक्ष संजय निबाळकर यांनी पारीत केले. प्रल्हाद महाजन यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव याचे अभिनंदन केले या वेळेला तापी पुर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय निबांळकर सचिव उज्वल मराठे उपसचिव नितिन बाणाईत, खजिनदार कमलाकर माळी, उपखजिनदार विनोद सेतवाल, यावल तालुका वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. तालुका अध्यक्ष्य जिवन चौधरी यांनी बैठकीस उपस्थित सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचे आभार मानले

Protected Content