इन्शुरन्सचा लोभ भोवला; व्हेपर्स फॅक्टरीचा मालकासह तिघे ताब्यात

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इन्शुरन्स क्लेमचा लाभ मिळवण्यासाठी निंबोल येथील एका इसमाने चोरीचा बनाव करून रावेर पोलिस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली होती. या गुन्हा संदर्भात पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फिर्याद दिलेल्या आरोपी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत चोरीस गेलेल्या ४ लाख चाळीस हजारराचे व्हेपर्स मशनरी जप्त केल्या आहे.यामुळे पोलिस प्रशासनाचे नागरीकां मधुन कौतुक होत आहे.

या बाबत वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंबोल येथील निरज सुनिल पाटील यांचे नांदुरखेडा शिवरात श्रीकृष्ण केला व्हेपर्स ही फॅक्टरी आहे.दि ३ रोजी निरज पाटील यांच्या फॅक्टरीतुन विविध मशनरी चोरीस गेल्या होत्या.रावेर पोलिसांनी या गुन्हा संदर्भात तपासाचे चक्र फिरवायला सुरुवात केली.यावेळी पोलिसांनी आरोपी निरज पाटील (वय 24 वर्षे) रा निंबोल,उमेश सुतार (वय 24 वर्षे) कौशल जंजाळकर, (वय 19 वर्षे ) दोघे रा. मेहतर कॉलनी रावेर येथून ताब्यात घेत त्यांची विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे.या बाबत तिघांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तपास

पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोकॉ सचिन घुगे पोकॉ विशाल पाटील, पोकॉ प्रमोद पाटील,पोकॉ महेश मोगरे,पोकॉ राहुल परदेशी यांनी गुन्हाचा तपास करून आरोपी ताब्यात घेतले आहे. दरम्यान चोरीचा बनाव करणा-या तिघ आरोपीं कडून ४५ हजार रुपये किमतीची बनाना वेफर्स मशीन, ४५ हजार रुपये किमतीची पोटॅटो वेफर्स मशीन, ३५ हजार रुपये किमतीचा पोटॅटो पीलर मशीन, ४८ हजार रुपये किमतीचा ड्रायर मशीन, १५ हजार रुपये किमतीचा पॅकींग मशीन, १७ हजार रुपये किमतीचा एक ब्लोवर मशीन, १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा कोटिंग पॅन मशीन, ९० हजार रुपये किमतीच्या पॅकींग मशीन असा एकूण ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Protected Content