शरद कोळी यांच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या विरोधात आता पाचोर्‍यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांची भाषणे प्रचंड वादग्रस्त ठरली. त्यांनी धरणगावात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पाचोर्‍यात आमदार किशोर पाटील तर एरंडोलमध्ये आमदार चिमणराव पाटील यांच्या विरोधात अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टिका केली. या अनुषंगाने त्यांच्या विरोेधात पहिल्यांदा धरणगाव आणि नंतर एरंडोलमध्ये गुन्हा दाखल झाला. यानंतर आता त्यांच्या विरोधात पाचोरा पोलीस स्थानकात देखील गुन्हा दाखल झाला आहे.

पाचोरा पोलीस स्थानकात किशोर गुणवंतराव बारवकर यांनी फिर्याद दिली. यात शरद विठ्ठल कोळी यांनी आपल्या भाषणातून आमदार किशोर पाटील यांचा अपमान केला असून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात भादंवि कलम-१५३, ५००, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content