यावल पंचायत समितीसमोर निळे निशाण संस्थेचे एकदिवसीय निर्दशने

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल पंचायत समिती अंतर्गत शासनाकडून प्राप्त दलित वस्ती सुधार योजनांच्या निधीचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निळे निशाण या सामाजिक संस्थेच्या वतीने यावल पंचायत समितीसमोर आज एकदिवसीय निर्दशने करण्यात आली.

हे निर्दशने आज यावल पंचायत समिती समोर निळे निशान या सामाजीक संस्थेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंनद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

याप्रसंगी निळे निशान संस्थेच्या नियोजन विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश तायडे, सामाजीक न्याय व रोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे , जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , फैजपुर विभागाचे अध्यक्ष भगवान आढाळे, तालुका अध्यक्ष विलास भास्कर यांच्यासह मोठ्या संख्येत महीला व कार्यकर्ता याप्रसंगी उस्थित होते, संस्थेच्या वतीने पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

Protected Content