कुरकुर नाल्यावर बंधारायुक्त पुलांचे भूमिपुजन लवकरच : पालकमंत्री

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बिलवाडी परिसरातील कुरकुट नाल्यावर बांधारायुक्त पुलांसाठी तब्बल २० कोटी रूपयांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. पुलांच्या कामांमुळे ग्रामीण भागातील दळण-वळण सोईचे होणार असून शेती विकासालाही गती येईल.

बिलखेडा ते बिलवाडीच्या दरम्यान गलाठी नदीवरील १ कोटी ३४ लाख रूपयांच्या निधीतून तयार होणार्‍या पुलाच्या भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. हा पूल २० मीटर लांबीचा असून याच्या माध्यमातून परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांना सुविधा मिळणार आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रदीर्घ काळापासून मागणी करण्यात आलेल्या या पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

ना. गुलाबराव पाटील आपल्या मनोगतातून म्हणाले की, बिलवाडी आणि परिसरात विकासकामांना वेग आलेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून गावाला ग्रामपंचायतीसाठी २० लक्ष रूपयांचा निधी देण्यात आला असून हे काम प्रगतीपथावर आहे. तसेच आगामी काळात परिसरातील कुरकुट नाल्यावर बंधारावजा पुल बांधण्याचे काम  मंजूरीसाठी पाठपुरावा सुरू असून यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करून याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.  बिलवाडीसह परिसरातील गावांमध्ये विकासाला गती मिळाली असून याची प्रचिती विविध कामांच्या माध्यमातून जनतेला येत असल्याचे ना. पाटील यांनी आवर्जून नमूद केले.बिलवाडी फाट्याजवळ  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लहान पुलाचे काम मंजूर करून लवकरच भूमिपूजन करणार असल्याचेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होणार ६ पूल

या संदर्भातील वृत्त असे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या एडीबी टप्पा २ अंतर्गत धरणगाव आणि जळगाव तालुक्यांमध्ये ६ महिन्यांपूर्वी पुलांच्या  ७ कोटी २५ लाखांच्या  ६ कामांना मान्यता मिळाली असून यात धार ते चोरगाव रस्त्यावरील ३ पुलांसाठी अनुक्रमे १ कोटी २२ लाख;  १ कोटी १५ लाख आणि एक कोटी दोन लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासोबत पथराड-वंजारी-खपाट ते बोरखेडा रस्त्यावरील पुलासाठी १ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जळगाव तालुक्यातील हायवे ते तरसोद पुलाचे बांधकाम १ कोटी १८ लाख आणि बिलखेडा ते बिलवाडी १ कोटी ३४ लाख रूपयांची मान्यता मिळाली आहे. यातील बिलखेडा ते बिलवाडी यांच्या दरम्यानच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. बिलखेडा ते बिलवाडी या दोन गावांना जोडणार्‍या गलाठी नाल्यावरील हा पूल २० मीटर लांबीचा असून यासाठी १ कोटी ३४ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

उद्घाटनस्थळी आगमन होताच पालकमंत्र्यांच्या अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. पवन सोनवणे, उपसभापती पती समाधान चिंचोरे, रमेशआप्पा पाटील, आत्मा कमिटीचे पी.के. पाटील, रोजगार हमी योजनेचे रवींद्र कापडणे, उपशिक्षक शिरीष जाधव, तालुका उपप्रमुख धोंडू जगताप, म्हसावद सरपंच गोविंदा पवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता जितेंद्र सोनवणे, शाखा अभियंता धिरेंद्र पाटील, सरपंच सौ. सुुलभा भरत पाटील, उपसरपंच विनोद पाटील, विजय आमले, विकासो चेअरमन भगवान पाटील, शीतल चिंचोरे, सिंधूताई जगताप, हौशीलाल परदेशी, दिनेश पाटील, समाधान पाटील, आबा मिस्तरी, आणि भगवान वाघ यांची उपस्थिती होती.

आपल्या प्रास्ताविकातून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेशआप्पा पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच फर्निचरसह ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी दिला असून ते काम सुरू असून आता नव्याने होणार्‍या पुलाच्या माध्यमातून गावकर्‍यांची सोय होणार असल्याचे सांगत या कार्यक्रमाचे महत्व विशद केले.

 

 

Protected Content