किनगाव येथे गुरुपौर्णिमानिमित्त वृक्षारोपण

0
21


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील स्वामी समर्थ संस्थेतर्फे विविध ठिकाणी गुरूपौर्णिमा व वसुंधरा दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रमेश चौधरी यांचे हस्ते गावात ठिकठिकाणी विविध जातींच्या शंभर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलीत. यावेळी यावल पंचायत समीतीचे माजी उपसभापती व सदस्य उमाकांत पाटील, किनगाव येथील व्हि.मार्टचे संचालक मनिष पाटील, माजी सरपंच मिलींद चौधरी, ग्राम पंचायत समिती सदस्य प्रमोद पाटील, बबलू कोळी, सचीन तडवी, संजय वराडे, पी.ए.समीर तडवी, मीनाताई, चेतन धनगर, देविदास महाजन, मनीष कौठलकर, नारायण महाजन, प्रमोद पाटील, बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक पोपतसिंग जाधव व स्वामी समर्थ केंद्राचे सेवक पुरुषोत्तम पाटील, आनंदा हिवराळे इतर मान्यवरांसह गावातील ग्रामस्थ मंडळी प्रामुख्याने उपस्थीत होते.