ओबीसी महासभा  जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र बारी यांची निवड

WhatsApp Image 2020 02 21 at 5.32.58 PM

यावल, प्रतिनिधी। येथील सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र शामराव बारी यांची ओबीसी महासभाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे

संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण गाढवे यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी आयोजित जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत राजेंद्र बारी यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातुन ओबीसी समाजातील रुग्ण तसेच वयोवृद्ध अपंग यांच्या हितासाठी व सेवेसाठी कार्य करण्याची सiधी दिल्या बद्दल राजेन्द्र बारी यांनी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष व सर्व पदधिकारी यांच्या आभार मानले. बारी यांच्या जिल्हा अध्यक्ष निवडीचे सर्व समाज बांधवांकडुन स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content