यावल येथे गुरूपौर्णिमा उत्सव साध्या पध्दतीने साजरा; भाविकांनी घेतले महर्षी व्यासांचे ऑनलाईन दर्शन

यावल प्रतिनिधी । कोरोनाविषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महर्षी व्यास महाराजांचा उत्सव कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने महर्षी श्री व्यासांची पूजा अर्चना करून पुरोहितांचे मंत्रउच्चाराने सकाळच्या सुमारास साजरे करण्यात आले. यावेळी भाविकांना महर्षीचे ऑनलाईन दर्शन घेतले.

महर्षी व्यास महाराजांचे प्रसिद्ध अशा या मंदिरात सालाबाद प्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेला उत्सव साजरा करण्यात येत असतो. परंतु यावर्षी संपूर्ण देशात कोरोना विषाणूंच्या संसर्गाने सर्वत्र थैमान घातले असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात या पार्श्वभूमीवर महर्षी व्यास मंदिर संस्थानतर्फे आमदार गुरुपौर्णिमेला महर्षी व्यास महाराजांच्या मंदिरात साजरा होणारा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच महर्षी व्यास मंदिर विश्वस्त मंडळातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सूचना देऊन मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे गुरुपौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने हजारो दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असणाऱ्या शहरातील प्रमुख मार्गावर आज सकाळपासूनच शांतता व सुकसुकाट दिसून येत होती. दरम्यान महर्षी श्री व्यास महाराजांचे सर्वसामान्य भाविकांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दर्शन व्हावे याकरिता मंदिर विश्वस्तांच्या वतीने फेसबुक व्हाट्सअप ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Protected Content