जळगाव जिल्हा प्रशासन व इंडियन रेडक्रॉसतर्फे ९ लाखहून अधिक ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्या तयार – गाडीलकर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्य मंत्रालय, केंद्र सरकार यांनी प्रमाणित केलेले होमिओपॅथी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ चे तयार करण्याचे काम सुरु असून आतापर्यंत ९ लाख ३२ हजार गोळ्या तयार करण्यात आल्या असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे औषध अतिशय प्रभावीपणे काम करते. यासाठी जिल्हा प्रशासन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्यातर्फे जिल्ह्यातील सुमारे १२ लाख कुटुंबियांना या गोळ्यांचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मु.जे. महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद भवन येथे या गोळ्या तयार करण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी, कृषी विभाग, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षण, शिक्षण विभाग, सिंचन विभाग अशा वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी व नागरिक हे स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. या गोळ्या तयार बनवण्यासाठी फक्त ३ रुपये इतका खर्च येत असून यासाठी निधी जमा करण्यात आला आहे. दररोज किमान ३०० स्वयंसेवक हे १ लाखाहून अधिक बाटल्या पॅकिंग करत आहे. यातील ७ लाखाहून अधिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे तर उर्वरित गोळ्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या गोळ्या नागरिकांपर्यंत निशुल्क पोचविल्या जात आहे. यावेळी पत्रकार परिषदेस रेडक्रॉस सोसायटीचे गाणी मेमन, डॉ. अपर्णा मकासरे, नितीन रेदासनी, विनोद बियाणी, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे उपस्थित होते.

Protected Content