गुरु हृदयावरील पडदा हटवितो : संत गोपाल चैतन्यजी महाराज(व्हिडिओ )

रावेर, प्रतिनिधी । जे आपले हृदयात काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकार रूपी पडदा आहे ते हटवून गुरु हे ज्ञान व भक्तिरूपी परमात्माचे दर्शन घडवितो असे संत गोपाल चैतन्यजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचनांत सांगितले.

सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेले रावेर तालुक्यातील पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी पन्नास हजाराच्या आसपास देशभरातून चैतन्य साधक परिवारासह येत असतात. भाविक परम पुज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधि दर्शनाकरिता श्री वृन्दावन धाम पाल आश्रमात येतात. यामधे महाराष्ट्रसह मध्यप्रदेशातुन शेकडो किमीचा दिंडी सोहळा पायी प्रवास करुन पालला येतात. परंतु, यंदा कोरोनाचे सावट सर्वत्र पसरलेले असून यावर्षीची गुरुपौर्णिमा आपापल्या घरिच साजरी करण्याचे आवाहन आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्यासह केंद्रीय समितीने केले होते.त्यामुळे साधकानी घरिच राहून ५ जुलै रोजीच्या गुरुपौर्णिमेचे परम पूज्य बापुजी समाधि दर्शन,तसेच पादुका पूजन, आरती व श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सत्संग अमृत वाणीचे लाभ आश्रमात संत महंतच्या सानिध्यात सोशल डिश्टिंगचे पालन करुन व ‘चैतन्य यूट्यूब चैनल’ च्या माध्यमातून घडविले. या सत्संगात श्रधेय महाराजजी यांनी जे आपले हृदयात काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकार रूपी पडदा आहे ते हटवून गुरु हे ज्ञान व भक्तिरूपी परमात्माचे दर्शन घडवितो. पुढे श्रधेय महाराजजी यांनी गुरु विना मनुष्य भवसागर पार होऊ शकत नाही. संत नामदेव यांना छपन्न वेळा पांडुरंगानी दर्शन दिले होते तरीही त्यांना गुरु वीना अस्तित्वचे ज्ञान प्राप्त झाले नव्हते. परंतु, ज्यावेळी संत विशोबा खेचर यांना गुरु मानले त्या वेळेस खरे अस्तित्व प्राप्त झाले याकरिता जीवनात गुरु असणे आवश्यक असल्याचे प्रवचनांत सांगितले.

 

https://www.facebook.com/watch/?v=612469982998462

Protected Content