चुंचाळे येथील गुरू शिष्य पुण्यतिथी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर पारंपारीक पध्दतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थिती धार्मिक विधी संपन्न होईल तेव्हा येथे दर्शना करीता कोणी येवु नये, असे आवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे.

 

दरवर्षी वैशाख शुध्द बारस रोजी चुंचाळे येथे गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन असते. यंदा २३ मे रोजी रविवारी येथे हा सोहळा साजरा होणार आहे. मात्र, कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनेनुसार येथे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे व मंदिरात भक्त, भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशात रविवारी पारंपारीक पध्दतीने श्री समर्थ सदगुरू सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ सदगरू वासुदेव बाबा कर्मभूमी चुंचाळे ता. यावल येथे साजरा होणारा गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा होईल. यात मंदिरातील पुजारी मूर्ती स्नान व पूजाअर्चा करतील व बाबांच्या सर्व महाराष्ट्रसह गुजरात व मध्य प्रदेशातील भक्तांनी घरूनचं दर्शन घ्यावे कुणीचं दर्शना करीता येवू नये, असे आवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे

Protected Content