खोटे नगर परिसरात जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजारा

जळगाव प्रतिनिधी । जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्रधिकरण व इन्स्टिट्यूट फॉर रूरल डेव्हलपमेंट ॲण्ड सोशल सर्व्हिसेस यांच्यावतीने संयुक्त विद्यमानाने उत्कर्ष मतिमंद विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

याप्रसंगी या शिबीरात वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण मुठे यांनी मार्गदर्शन केले. त्याच्यासोबत चेतना व्यसनमुक्तीचे संचालक नितीन विसपुते तसेच जिल्हा विधी कार्यालयातील भारती महस्कर, जिल्हा वकील संघाचे ॲड. शरद नायदेसर, ॲड.विजय दर्जी व ॲड. विनोद भुसारी आदी उपस्थित होते. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पालकांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी राष्ट्रीय न्यास १९९९ कायद्यांतर्गत पालकत्व व निरामय आरोग्य विमा याबाबत तसेच संस्थेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात शाळेतील दोन विद्यार्थ्यांना चेतना क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २९ ऑगस्ट जागतिक क्रीडा दिनानिमित्त शाळेतील अनिरुद्ध व सारिका यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी व मनियार लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content