रावेर महसूल विभाग वसूलीत पन्नास टक्यांवर अडकला

 

रावेर, प्रतिनिधी । मागील वर्षी शंभर टक्के वसूली करणारे रावेर महसूल विभाग यंदा चांगलेच मागे पडला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या उद्दीष्ट पैकी आतापर्यंत फक्त ५१: ६२ टक्केच वसूली करण्यात आली आहे. 

आधीच शासनाच्या तिजोरीत ठणठण असतांना रावेर महसूलची फक्त पन्नास टक्केच वसूली चिंतेचा विषय आहे.  रावेर महसूल विभागाने मागील वर्षी शंभर टक्के वसूली केली होती व जिल्हाभरात प्रसिध्दी मिळवली होती. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी २०२१ साठी दहा कोटीचे उद्दीष्ट रावेर महसूल विभागाला दिले आहे. आज दि १२ मार्चपर्यंत रावेर महसूलचा ४ कोटी ५१ लाख ७० हजार म्हणजे ५१:६२ टक्केच वसूल झाला आहे.३१ मार्चपर्यंत शंभर टक्के वसूल होण्याचा विश्वास महसूल विभागाला आहे.

 

Protected Content