सतिश मोहगांवकर यांना सर्वोत्तम राष्ट्रीय योगासन ज्युरी पुरस्कार.

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलडाणा जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे मार्गदर्शक सतीश मोहगावकर यांना नॅशनल योगासन स्पोर्ट फेडरेशनद्वारे मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सतिश मोहगांवकर यांना सर्वोत्तम राष्ट्रीय योगासन पंच (ज्युरी) चा अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. सतिश मोहगांवकर हे मागील ४० वर्षापासून योगासन खेळाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सुमारे ३४ वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय योगासन खेळ पंच म्हणून कार्य केले आहे. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय योगासन खेळ स्पर्धांमध्ये त्यांनी दोनदा टेक्निकल डायरेक्टर म्हणून कार्य केले आहे. तसेच सी. बी. एस. ई. च्या राष्ट्रीय योगासन खेळ स्पर्धांमध्ये एकदा टेक्निकल डायरेक्टर म्हणून कार्य केले आहे. बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे मागील २५ वर्षांपासून टेक्निकल डायरेक्टर आणि राज्य स्पर्धा प्रमुख म्हणून भुमिका बजावली आहे.

नॅशनल योगासन स्पोर्ट फेडरेशन द्वारे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय योगासन खेळ स्पर्धांमध्ये जजेस कोऑरडिनेटर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम बेंगलोर आणि खेलो इंडिया युथ गेम पंचकुला येथील योगासन खेळ स्पर्धांमध्ये सतिश मोहगांवकर यांची  इंटरनॅशनल टेक्निकल ऑफिशियल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सतिश मोहगांवकर हे महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे व्हाईट प्रेसिडेंट आणि टेक्निकल डायरेक्टर आहेत. आपल्या ह्या यशाचे श्रेय  गुरुवर्य डॉ. अरुण खोडस्कर सर तसेच म. यो. स्पो. असो.चे अध्यक्ष बापू पाडळकर आणि सचिव डॉ.संजय मालपाणी यांना देतात. योगासन खेळ क्षेत्रातील व्यक्तींकडून  त्यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होतो असून बुलडाणा जिल्हा योगा असोसिएशनतर्फे सतीश मोहगावकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष डॉ. पी. आर. उपर्वट आणि समन्वयक तेजराव डहाके यांनी कळविले आहे.

Protected Content