बांभोरीजवळील जैन कंपनीजवळ तरूणाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून जळगावला कामावर जात असताना तरुणाला अज्ञात वाहनाने बांभोरी गावाजवळील जैन इरिगेशन कंपनीजवळ जबर धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवार, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. जखमी तरूणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “सचिन गोपाल झंवर (वय ३०, रा.पाळधी ता. धरणगाव) असे त्याचे नाव आहे. जळगाव येथे औषधी विक्रीच्या दुकानांमध्ये तो कामाला आहे. गुरूवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सचिन झंवर हा नेहमीप्रमाणे पाळधी येथील घरून जळगावला निघाला होता. जैन इरिगेशन जवळ आल्यावर अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

यात त्याच्या डोक्याला व डाव्या हाताला मार लागून तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याच्या मदतीला जैन इरिगेशन कंपनीचे लोक धावून आले. त्यांनी तात्काळ कंपनीची रुग्णवाहिका आणून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारार्थ दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले.”

Protected Content