अमिताभ बच्चन यांनी दिल्या संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याला मराठीतून शुभेच्छा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महानायक अमिताभ बच्चन यांनी आज संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्याने सोशल मीडियात हा चर्चेचा विषय बनला आहे.

महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. विशेष करून ते ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असून यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत असते. आज त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा मराठीतून देण्यात आल्या असून याला संत मुक्ताई यांची प्रतिमा देखील जोडण्यात आलेली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटला सोशल मीडियात मोठी पसंती मिळाली असून ते व्हायरल झाले आहे. तर मुक्ताईनगर तालुक्यात अनेकांनी या ट्विटचा स्क्रीन शॉट आपल्या व्हाटसऍपवर स्टेटस म्हणून ठेवला आहे. अमिताभ यांनी ट्विट करून आज संत मुक्ताई यांना अंतर्धान सोहळ्यानिमित्त वंदन केले आहे. त्यांनी लवकरच येथील मंदिरात प्रत्यक्ष दर्शनासाठी यावे अशी देखील अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

खाली पहा : अमिताभ बच्चन यांनी केलेले ट्विट !

Protected Content