मोरपंख संस्थेतर्फे समाजसेवकांसह गुणवंताचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रायसोनी नगरात मोरपंख बहुउद्देशीय संस्थे तर्फे एक समाजाभिमुख उपक्रम व कौतुक सोहळयात काही प्रेरणादायी , जेष्ठ समाजसेवक आणि किर्तीवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

याप्रसंगी आमदार राजुमामा भोळे , उपमहापौर सुनील खडके, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे , समाजसेविका सुचित्रा महाजन ,निशा अत्तरदे ,डॉ.विपीन खडसे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ.प्रमोद महाजन होते. या कार्यक्रमात आमदार भोळे , तुषार वाघुळदे, डॉ.प्रमोद महाजन यांनी प्रबोधन करून समाज एकसंघ होण्यासाठी सर्वकंश प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी छोटे मोठे स्नेहसंमेलने व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. यावेळी झालेल्या गप्पात कृषी , रेल्वे आणि होतकरू मुलांबाबत सांगोपांग चर्चा झाली. लवकरच या विषयाबद्दल एक सभा आयोजित करण्यात येईल असे सूतोवाच आमदार भोळे , उपमहापौर खडके श्री.वाघुळदे , सुचित्रा महाजन यांनी उपस्थितांना दिले.

समाजाच्या विविध समस्या व प्रश्नांबाबतही सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमात कृष्णा खडसे, तुषार वाघुळदे, पंकज नाले, मंगला पाटील, दीपक दाभाडे, सुचित्रा महाजन, निशा अत्तरदे, डॉ.जयंती चौधरी, डॉ.पराग चौधरी, विजय लुल्हे, गीता चौधरी, ज्योती राणे यांचा शाल, सन्मानपत्र आणि मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. मोरपंख ‘ या संस्थेच्या अध्यक्षा नयना टोके , उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील , सचिव गणेश टोके आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आभार डॉ.जयंती चौधरी यांनी मानले.

Protected Content