दोन महिलांना उडविणार्‍या इनोव्हा क्रिस्टाचा लागला शोध; गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सामनेर येथील दोन महिलांना भरधाव वाहनाने उडवून ठार केल्याची घटना आज पहाटे घडली होती. यातील वाहन हे इनोव्हा क्रिस्टा असल्याचे निष्पन्न झाले असून याच्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज पहाटे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या जिवलग मैत्रीणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली होती. याचा अवघ्या काही तासातच  पाचोरा पोलिसांनी तपास लावुन अपघातास कारणीभुत ठरलेल्या चारचाकी वाहनास जळगांव येथुन जप्त केले आहे. 

नित्यनियमाप्रमाणे सामनेर ता. पाचोरा येथील रहिवासी मनिषा साहेबराव पाटील (वय – ५०) व अनिता शहादु पाटील (वय – ४८) या जिवलग मैत्रीणी पहाटे माॅर्निंग वाॅकसाठी गेल्या असता पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना चिरडुन घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना घडली होती. 

घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे सह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील तपासणी केली असता तेथे वाहनाचे स्पेअर पार्ट आढडुन आले. त्या स्पेअर पार्टचा सहारा घेत पाचोरा शहरातील गॅरेजवर विचारपुस करुन सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे, पो. काॅ. प्रभाकर गोकुळ पाटील, विनोद बेलदार, निलेश गायकवाड यांनी आपला मोर्चा जळगांव कडे वडविला असता एका नामांकित चारचाकी शोरुम मध्ये एम. एच‌. १९ सी. एफ. ९९९ ही इनोव्हा (क्रिस्टा) गाडी आढळून आली. सदर गाडी ही पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहे.

 

Protected Content