रावेर पोलिसांच्या पेट्रोलिंगमुळे खुनाचा गुन्हा उघड; चौघे ताब्यात

रावेर प्रतिनिधी । रावेर नजिक झालेल्या अज्ञात तरुणाचा खून प्रकरणाच्या गुन्हाचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी खून केल्याची कबूली देखील दिली असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी रावेरात घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिली आहे. 

याबाबत वृत्त असे मयत सौरभ गणेश राऊत वय २२ रा गेवराई (जि बिड) हा दि २ रोजीच्या रात्री बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या एक पानटपरीत चोरी करण्याच्या संशयावरुन आरोपी महेश महाजन,भैय्या धोबी, विकास महाजन,विनोद सातव यांनी मयत सौरभ याला मोटरसायकलवर बसवून गोवर्धन नगर(भूत बंगला) जवळ नेले व तेथे मारहाण करून रुमालाच्या साहाय्यने गळा आवळुन खून केला आहे.चारही आरोपी अतकेत आहे.

तपास कामात यांचा होता सहभाग 

सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी,डीवायएसपी राजेंद्र रायसिंग,पो नी रामदास वाकोडे,सा पो नी शितल कुमार नाईक,फौजदार मनोज वाघमारे,मनोहर जाधव पोलिस कर्मचारी बिजू जावरे,नंदकिशोर महाजन,प्रदीप सपकाळे,महेंद्र सुरवाडे,निलेश चौधरी,सुकेश तडवी,सुरेश मेढे,मंदार पाटील,विशाल पाटील,सचिन गुघे,प्रमोद पाटील पुरषोत्तम पाटील,सुनिल वंजारी आदीचा तपास कामात सहभाग होता.

तपास पथकाल ३५ हजार बक्षीस

दरम्यान पोलिस अधिक्षक डॉ मुंढे यांनी खून प्रकरणाचा तात्काळ छळा लावला व क्लिस्ट गुन्हा उघड केल्या बद्दल साहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांना दहा हजार तर तपास कामी सहकार्य करणाऱ्या सर्वांना २५ हजार असा एकूण ३५ हजार रुपये बक्षीस पोलिस अधिक्षक डॉ मुंढे यांनी जाहीर केले आहे.

पेट्रोलिंगमुळे झाला गुन्हा उघड 

खूनाची घटना झाली त्यारात्री साहायक पोलिस निरिक्षक नाईक रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करत होते. त्यारात्री चौघे आरोपी मध्यरात्री फिरत असताना दिसले त्यावेळी संशयिताचे नाईक यांनी फोटो काढले होते.तर सुकेश तडवी यांनाही त्या परीसरात या दिसले होते. अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची घटना दिवसा उघडकिस येताच पोलिसांनी त्या रात्री पाहीलेले चौघे यांची चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबूली दिली अश्या पध्दतीन क्ट्रिटिकल गुन्हा रावेर पोलिसांच्या पेट्रोलिंगमुळे उघड झाला आहे.

Protected Content