खाटीकवाडा येथील तरूणाची फसवणूक

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील खाटीकवाडा येथे राहणाऱ्या तरूणाचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि ४०० रूपये घेवून फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरबाज जाकीर खाटीक वय २२ रा. खाटीकवाडा धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता अरबाज जवळ एक अनोळखी व्यक्ती आला. फोनवर बोलायचे आहे असं सांगून अरबाजचा मोबाईल घेतला. त्यानंतर त्यांने अरबाजच्या खिश्यातून ४०० रूपये काढून घेत पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर अरबाज जाकीर खाटीक याने अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.

Protected Content