पायावरून ट्रक गेल्याने क्लीनर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील जळगाव टोलकाट्याजवळ ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे क्लिनरच्या पायावरून ट्रक गेल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अश्फाक हबीब पिंजारी (वय-१८, रा.तांबापुरा, जळगाव) हा तरुण ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ५१३०) यावर क्लिनर म्हणून कामाला आहे. तर चालक म्हणून रज्जाक रसूल पिंजारी रा. तांबापुरा हा काम करतो. दरम्यान १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील जळगाव तोल काट्यासमोर ट्रकजवळ क्लीनर अश्फाक पिंजारी हा उभा होता. त्यावेळी चालक रज्जाक पिंजारी याने ट्रक पुढे नेत असतांना परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून क्लिनर अश्फाक पिंजारी याचा पायावरून नेला. त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अशफाक याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी मंगळवारी १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार ट्रकचालक रज्जाक रसूल पिंजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.

Protected Content