आयशर अन् ट्रेलरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । यावतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा गावाजवळ मालवाहू आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून ७० बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक असे की, यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे मालवाहू आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशरमधील ७० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने बकरामालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, वाहनातील दोन जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी आहेत. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, अपघातात दोन्ही मोठ्या वाहनांचा चुराडा झाला आहे. अपघातामधील गंभीर जखमींना उपचारार्थ अर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातस्थळी स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला.

Protected Content