जळगावात धाडसी चोरी ; ५० हजाराच्या रोकडसह मोबाईल लंपास

Gold Thift

जळगाव प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा भागातील एका घरात अज्ञात चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश मिळवीत 50 हजार रुपची रोकड व दोन मोबाईल लंपास केल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश रवींद्र बारी (वय 40, रा. भवानी मंदिराच्या पाठीमागे, पिंप्राळा) हे आपल्या कुटुंबासह नेहमी प्रमाणे मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण करून झोपले. त्यावेळी त्यांनी दरवाजा बंद करून खिडकी उघडी ठेवलेली होती. रवींद्र बारी यांनी दवाखान्यासाठी लागणारे 50 हजार रुपये रोख पॅंटच्या खिशात ठेवून खुंटीवर टांगलेले होती. अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकीचा फायदा घेत मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास घरात प्रवेश करत 50 हजार रुपये ठेवलेली पॅन्ट आणि दोन मोबाईल चोरीस नेले.
रवींद्र बारे यांचा मुलगा हा गंभीर आजारी आहे. तो ऑक्सीजनवर असल्याने त्याला काही बोलतात किंवा हालचालही करता येत नव्हती. त्यामुळे मध्यरात्री दोन वाजता ज्यावेळेस अज्ञात चोरट्याने घरात चोरी करण्याचे इरादाने आत शिरला. त्यावेळी चोराला पाहून देखील त्याला कुठल्याही पद्धतीने बोलता किंवा हालचाल करता आली नाही. चोरट्याने मोबाईलसह पॅन्ट मधील 50 हजार रुपये काढून पॅन्ट घराच्या बाजूला फेकून दिली. ही बाब पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी रामानंदनगर पोलिस स्थानकाचे कर्मचारी रवींद्र पाटील आणि रुपेश ठाकूर यांनी पाहणी केली. रामानंदनगर पोलिसात याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content