तांबापूरा येथे टेपच्या आवाज कमी करण्यावरून मायलेकीला मारहाण

 

जळगाव :  प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा भागात टेपचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून माय लेकीला चौघांनी लाकडी बॅट व लोखंडी विळा मारून जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माया दत्तू याहिरे (वय-२०) रा. तांबापूरा ह्या आपल्या आई सिंधुबाई  दत्तू याहिरे यांच्यासह राहतात. ५ मार्चरोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे करण दिपक अहिरे यांनी टेपचा आवाज मोठा केला होता. तो आवाज कमी करण्यासाठी माया याहिरे यांनी सांगितले. याचा राग आल्याने करण अहिरे, अलका अशोक शिरसाठ, लक्ष्मण भावळू साळवे आणि छाया लक्ष्मण साळवे ( सर्व रा. तांबापूरा )  यांनी माया याहिरे  आणि तिची आई सिंधूबाई याहिरे यांना चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. लक्ष्मण साळवे याने सिंधूबाई यांना बॅटने मारहाण केली तर करण अहिरे याने लोखंडी विळा मारून दुखापत केली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Protected Content