भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाधळी ते रिंगणगाव रोडवरील इम्पेरिअरल शाळेजवळ भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी १ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र रविंद्र नन्नवरे वय-२८ रा. बांभोरी ता.धरणगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास त्याचे सहकारी रोहित धनराज नन्नवरे यांच्या सोबत पाधळी ते रिंगणगाव रस्त्यावरील इम्पेरिअल शाळेसमोरून दुचाकीने जात होते. त्यावेळी मागून येणारी रिक्षा चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करत दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील जितेंद्र नन्नवरे आणि रोहित नन्नवरे हे रोडवर पडल्याने गंभीर जखमी झाले. हा अपघात घडल्यानंतर चालक हा रिक्षा घेवून पसार झाला. याप्रकरणी सोमवारी १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.

Protected Content