भुसावळात अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक दुकान फोडले

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मॉडन रोडवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरट्यांनी दुकान फोडून धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत माहिती अशी की, मॉर्डन रोडवर मुख्य डाक कार्यालया शेजारी सुरेंद्र वासवानी यांचे हरीओम इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून ते सकाळी दहाला पुन्हा दुकान सुरू करण्यासाठी आले असता दुकानाचे शटर तोडण्याचे दिसून आले. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच साडेचार हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्यांनी लागलीच बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. पोलिसांनी देखील दुकानाची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, दोन ते तीन जण दुकानातील टीव्ही चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content