जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर माथेफिरूचा धिंगाणा ! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील नशिराबादजवळच्या सिमेंट कारखान्याजवळ असलेल्या मुकेरीया ढाबाजवळ एक माथेफिरू व्यक्तीने महामार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवित असून काहींना दगड व चावाही घेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी वाहनधारकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ असलेल्या मुकेरीया ढाबाजवळ साधारणत ५५ ते ६० वयोगटातील एक माथेफिरू व्यक्ती तेथे उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे लपलेला होता. नंतर तो बाहेर आल्याने त्याने दगडफेक सुरू केली आणि बेधडकपणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट राष्ट्रीय महामार्गावर उतरला आणि ये-जा करणारे दुचाकी, चारचाकी तसेच कारच्या समोर तात्काळ उभा राहून तर कधी रस्त्यावर झोपून जात होता. वेगाने धावत असलेल्या वाहनधारकांना अचानक अर्जंट ब्रेक दाबून घ्यावे लागत होते. त्याने ट्रक चालकांच्या कॅबिनमध्ये चढण्याचाही प्रयत्न करू लागला, हातात मोठे दगड घेत अनेकांना घाबरवले, त्यामुळे वाहनचालक भेदरलेल्या अवस्थेत दिसून आले. काहींनी तर त्याच्या हातापायाला दोरी देखील बांधली, मात्र त्याने खाली वाकून दाताने तोडून टाकली, अनेकांनी त्यास बेदम मारहाण केली, एका दूध विक्रेत्या मोटारसायकल स्वाराने लाथा बुक्क्याने जोरदार मारहाण केली असता त्याने चावा घेतला. तो मोठ्या प्रमाणात धिंगाणा घालत असून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. पुन्हा-पुन्हा तो रस्त्यावर वाहनाच्या समोर धावत पळत आडवा होऊन जाते आहे. काही दुचाकीस्वारांनी तर वाहन सोडून पळ काढला. हे कृत्य जवळपास एक ते दीड तास चालले. त्यास अनेकांनी रस्त्यालगत असलेल्या शेतात नेत बांधून ठेवले, पुन्हा त्याने जोरात झटका देत वाहन घडविण्याचे कृत्य सुरूच ठेवले. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक जण सावधानता बाळगत होते. या घटनेप्रकरणी काहींनी नशिराबाद पोलिसांना देखील कळविले, मात्र तिथे पोलीस पोहचलेच नाही. तो माथेफिरू त्याच परिसरात दडून बसलेला असतो, त्याचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/285779852665595/

Protected Content