कौशल्य हीच आजच्या तरुणाईची ताकद : मोदी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
स्वत:मध्ये असलेले कौशल्य सातत्याने वाढवणे त्यात वेळेनुसार बदल करणे ही काळाची गरज आहे. कौशल्य हीच आजच्या तरुणाईची ताकद आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड यूथ स्किल डे निमित्त देशभरातील तरुणांना संबोधित केले.

 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजचा दिवस 21 व्या शतकातील तरुणांना समर्पीत आहे. पाच वर्षापूर्वी आजच्या दिवशी कौशल्य भारत मिशनची सुरुवात झाली होती. कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालयाकडून या निमित्ताने एका डिजिटल संमेलनाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा दिवस 21 व्या शतकातील तरुणांना समर्पित आहे. आज कौशल्य ही तरुणांची सर्वात मोठी शक्ती आहे. बदलत्या पद्धतींनी कौशल्य बदलले आहे. स्किलची जी ताकत आहे ती माणसाला कुठल्या कुठं पोहोचवू शकते. एक यशस्वी व्यक्तीची हीच निशाणी आहे की, तो आपल्या स्किलच्या जोरावर कुठलीही संधी दवडू देत नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. शिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी उर्जा मिळते. तसेच आज आपले तरुण बर्‍याच नवीन गोष्टींचा अवलंब करीत आहेत, असे मोदी म्हणाले.

Protected Content