भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतूससह एकास अटक

भुसावळ प्रतिनिधी । बेकायदेशीर गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर बापूराव सपकाळे (वय-२०) रा. अंजाळे ता. यावल हा भुसावळात बेकायदेशी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेवून फिरत असल्याची माहिती भुसावळ शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी यावल नाकाजवळील फॉरेस्ट चौकीजवळ सापळा रचून १५ जुलै रोजी पहाटे ५ वाजता संशयित आरोपी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझाडाझडती घेतली असता बेकायदेशीर व विनापरवाना २३ हजार ५०० रूपये किंमतीचा गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतूसे मिळून आली. याप्रकरणी पोहेकॉ रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर सपकाळे याच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्निल नाईक, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोना दादा पाटील, पोना प्रविण हिवराळे यांनी कारवाई केली.

Protected Content