कॉंग्रेसकडून सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांना नोटीस ; उत्तरासाठी दोन दिवसाचा अल्टीमेटम

 

जयपूर (वृत्तसंस्था) सचिन पायलट आणि इतर १८ सदस्यांना विधिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. जर त्यांनी दोन दिवसांत उत्तर दिले नाही तर विधिमंडळ पक्षातून आपले सदस्यत्व रद्द करत आहेत असे समजले जाईल, असा स्पष्ट इशारा राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी दिला आहे.

 

काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांच्यासह १८ जणांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या सर्वाना दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, अन्यथा विधिमंडळ पक्षाचे सदस्यत्व रद्द केले जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच देव सचिन पायलट यांना शहापपणा देवो, आणि त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांनी आपली चूक मान्य करावी. सचिन पायलट यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे नेहमी खुले होते, आजही आहेत, असेही अविनाश पांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या नोटीसीला पायलट आणि त्यांचे समर्थक उत्तर देतात किंवा नाही?, दिलेच तर उत्तरातील मजकूर काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content