खोटे नगरात तरूणाची इमारतीवरून उडी घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । दादावाडी परिसरातील राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने घराच्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप धर्मराज निरखे (वय-३५) रा.आव्हाणे ता.जि.जळगाव ह.मु. पंडीत कॉर्नर, हॉटेल राधिकासमोर खोटे नगर स्टॉप हा फेब्रिकेशनचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संदीप निरखे याने खोटे नगर येथे राहत असलेल्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना १४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content