कामगारांनेच केली मालकाची अडीच लाखांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील एका कंपनीतील काम करणाऱ्या स्टोअर किपरनेच कंपनीची तब्बल २ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल समाधान पाटील रा. चुंचाळे ता. यावल जि. जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील त्रिनिटी महालासा दुर्गा सेल्स अँड सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे. त्याच ठिकाणी विशाल समाधान पाटील रा. चुंचाळे ता. यावल हा स्टोअर किपर म्हणून काम करतो. दरम्यान २०२२ ते २०२२ दरम्यान विशाल पाटील याने कंपनीच्या काम करीत असताना कंपनीचा विश्वास संपादन करून खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याने २ लाख ४३ हजार रूपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे कर्मचारी पुंडलिक प्रल्हाद लव्हाळे (वय-४०) रा. भागदरा ता. जामनेर जि. जळगाव यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल समाधान पाटील यांच्या विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण करत आहे.

Protected Content