भरधाव बसच्या धडकेत चिमुकला जखमी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुसुंबा ते लोहारा रोडवर भरधाव बसचा कट लागल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील गुल्ली लोहारा येथील गावातून कुसुंबा ते लोहारा रोडवरून बस क्रमांक (एमएच ४० एन ०९९४) जात होती. चालक भिमराज पुंडलिक शंखपाळ (वय-५८) रा. यावल याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भारधाव वेगाने चालत असलेली बस रस्त्यावर खेळत असलेला अल्फिया अरमान तडवी या दोन वर्षीय चिमुकल्याला कट मारला. त्या त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत जाहबिर शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीवरून बसचालक भीमराज पुंडलिक शंखपाळ याच्याविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक देवेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content