ट्रकच्या अपघातात मजूराच्या पायांचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रक चालू करून पुढे न नेता मागे घेतल्याने मजूराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना एमआयडीसीतील हॉटेल मैत्रेय जवळ घडली आहे. याबाबत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राजु आंबऱ्या गवळी (वय-५०) रा. देवकीनंदन चाळ, बळीराम पेठ, जळगाव हे मजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी १८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या  सुमारास एमआयडीसीतील हॉटेल मैत्रेयच्या मागे एका ठिकाणी काम करत असतांना बाजूला ट्रक (एमएच १९ जे ०६९१) उभी होती. ट्रक चालकाने ट्रक सुरू करून पुढे न नेता मागे गेतल्याने राजू गवळी यांच्या दोन्ही पायाला ट्रकचा फालक लागल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी १९ जुलै रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Protected Content