Home क्राईम जळगावात कॉम्बिंग ऑपरेशनमध्‍ये सापडले हद्दपार आरोपी

जळगावात कॉम्बिंग ऑपरेशनमध्‍ये सापडले हद्दपार आरोपी

0
40


जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात सोमवरी मध्‍यरात्री शहर पोलिसांनी कॉ‍म्बिंग ऑपरेशन मोहिम राबविली. या कारवाईत एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्‍यात आलेले अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

अजीज रशिद पठाण (३१, रा. गेंदालाल मिल) व तेजीम बेग नसीम बेग (३१, रा. तांबापुरा) असे अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत.  

अजील पठाण व तेजीम बेग यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्‍यात गुन्हे दाखल आहेत. त्यांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्‍यात आले होते. दरम्यान, सोमवारी मध्‍यरात्री पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरात कॉम्बिंग ऑपरेशमन मोहिम राबविली असता, दोघं हद्दपार आरोपी पोलिसांना सापडून आले आहे. दोघांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजय झाल्टे व रतन गिते हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound