सिंधी कॉलनी, खेडी पेट्रोलपंप परिसरातील ३ जुगार अड्डयांवर पोलिसांचा छापा

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलिसांनी आज तीन जुगार अड्डयांवर कारवाई करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला असून अडीच ते तीन हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्‍यात आला  आहे. 

खेडी पेट्रोलपंप परिसर, सिंधी कॉलनी तसेच रामेश्वर कॉलनी येथे सट्टा जुगाराचा खेळ खेळविला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मंगळवारी सकाळी मिळाली होती. एमआयडीसी पोलिसांनी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली. तेथे कृणाल एकनाथ हेरापले, साहिल धारवाल, विक्रम नाईक हे जुगार खेळताना आढळून आले. त्यानंतर दीड वाजता पोलिसांनी खेडी पेट्रोलपंपाजवळ सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर छापा मारला. त्याठिकाणी दीपक रमेश मोरे हा जुगार खेळविताना आढळून आला तर दुपारी २ वाजता सिंधी कॉलनी भागतील जुगार अड्डयावर धाड टाकल्यावर तेथे शब्बीर खान हमीद खान हा जुगार खेळताना आढळून आला. या संपूर्ण कारवाईतील पाचही जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून सुमारे अडीच ते तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्‍यात आला आहे. तसेच पाचही जणांविरूध्‍द एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंढे, मुकेश पाटील, किशोर पाटील, इम्रान अली सैय्यद, गोविंदा पाटील आदींनी केली आहे

Protected Content