कंडोमशिवाय सेक्स केल्यामुळे राजदूताविरोधात तक्रार !

पॅरिस: वृत्तसंस्था । सुरक्षित शरीरसंबंधासाठी कंडोमचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, कंडोमशिवाय सेक्स केल्यामुळे एका महिलेने राजदूताविरोधात तक्रार दाखल केली आहे. कंडोमशिवाय सेक्स करून संबंधित व्यक्तीने धोका दिला असल्याचे या महिलेने म्हटले आहे. ही व्यक्ती फ्रान्स सरकारची राजदूत असल्याचे समोर आले आहे.

संबंधित राजदूत आणि तक्रारदार महिलेने यापूर्वीही शरीरसंबंध ठेवले आहेत. त्या दिवशीही दोघांनी परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवले. यावेळी महिलेने त्या राजदूताला कंडोमचा वापर करण्यास सांगितले. मात्र, त्याने शरीरसंबंध ठेवताना त्याने कंडोम वापरला नसल्याची तक्रार महिलेने केली आहे. एका डेटिंग अॅपद्वारे या दोघांची भेट झाली होती.

 

या महिलेने सेक्स केल्यानंतरच्या तीन दिवसानंतर ही तक्रार दाखल केली आहे. सूत्रांनी राजदूताची ओळख उघड केली नाही. मात्र, एका मासिकाच्या वृत्तानुसार, हा राजदूत पश्चिम आशियातील एका देशात कार्यरत आहे. फ्रान्समधील कायद्यानुसार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवणे हा बलात्कार असतो. मात्र, जोडीदाराने कंडोम वापरण्याचा आग्रह केल्यानंतरही कंडोमशिवाय सेक्स केल्यास काय शिक्षा होऊ शकते याबाबत काहीही स्पष्टता नाही.

 

कंडोमचा वापर न केल्यास शरीरसंबंध ठेवल्यास एचआयव्ही अथवा इतर लैंगिक आजार होण्याची शक्यता असते. त्याशिवाय संबंधित महिला गर्भवती होण्याची शक्यता असते.

सेक्स करताना जोडीदाराला न कळवता कंडोम काढला होता. या २००७ मधील गुन्ह्यात स्विर्त्झलंडमधील कोर्टाने हा बलात्काराचा गुन्हा असल्याचा निर्वाळा देत पुरुष जोडीदाराला १२ महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.

Protected Content