वैद्यकीय संकुलांसाठी लागणाऱ्या बांधकामाच्या साहित्यांची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून  स्टील रॉड, स्केटर ट्युब आणि लोखंडी आसारी यासह इतर  बांधकामाचे साहित्य असा एकुण २५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात  चोरट्यांनी चोरून नेल्याचे शनिवारी उघडकीला आले. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात सर्व पॅथींचा समावेश असलेल्या वैद्यकीय संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवण्यात आले असून स्टोअर किपरही कार्यरत आहे. ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी काम थांबल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी चॅनल, रॉड, स्केअर ट्यूब असे एकूण २५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार शनिवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाता उघडकीला आले. चोरी झाल्याचे हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्टोअर किपर नितीन धाईतडक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहेत.

Protected Content