भुसावळात रेल्वे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा विना परवानगी जमाव; पोलीसांकडून दखल

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे भागातील रंगभवन येथे विना परवानगी बैठक घेणाऱ्या  रेल्वे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी २०० ते ३०० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जमाव केला होता. डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत असतांना वेळीच पोलीसांनी दखल घेत जमावाला रोखण्यास यश आले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी असलेले विद्यार्थ्यांना ऑल इंडिया अँप्रेंडिसशीप असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भरत परदेशी यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहरातील रेल्वे भागातील रंगभवन येथे बोलावून २००-३०० विद्यार्थांचा (जमाव) बैठक घेऊन डी.आर.एम कार्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत असतांना शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे बोडदे व प्रमोद पाटील पोलिस कर्मचाऱ्यांनी परवानगी विचारणा केली असता त्यांच्या जवळ कुठलीही परवानगी नसल्याने पोलिसांनी मोर्चा रंगभवना जवळ थांबवून जमाव हटविण्याच्या सूचना दिल्या. रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बल विभागाचे गोपनीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनापर्यंत अँप्रेंडिसशीप केलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज पोचवायचा असेल तर सर्वात आधी रेल्वे प्रशासनाकडून परवानगी घेतल्यानंतरच रेल्वे प्रशासनासमोर तुमचे प्रश्न मांडा नाहीतर सर्व विद्यार्थ्यां अडचणीत येथील असे काम करू नका अशी माहिती देऊन मार्गदर्शन केले. शहर पोलीस स्टेशनला भरत परदेशी यांना बोलावून विना परवानगी जमाव केल्याप्रकरणी कलम १४९ प्रमाणे नोटीस बजविण्यात आलेली आहे.

Protected Content