चोपडा निसर्गमित्र समितीची आढावा बैठक

 

चोपडा : प्रतिनिधी ।  छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समितीच्या  चोपडा  तालुका  शाखेची  बैठक नुकतीच वनश्री दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृह येथे झाली.

 

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निसर्गंमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांची उपस्थिती होती. या बैठकीत तालुक्यातील निसर्गमित्र समितीचा आढावा घेवून पुढील कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली. संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार आहीरे यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी समितीचे चोपडा तालुका कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार शिंपी यांना खान्देश पत्रकार संघ (धुळे ) मार्फत आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. गडाचे संरक्षण करणारे समितीचे संपर्क प्रमुख  विश्राम तेले यांना  शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र देवून गौरविण्यात आले. वनश्री दशरथ पाटील यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नंदलाल मराठे यांचा समितीच्या वातीने सत्कार करण्यात आला. संपर्क प्रमुख विश्राम तेले आणि सचिव दिनेश बाविस्कर यांचे  वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

 

प्रास्तविक तालुका अध्यक्ष वासुदेव पाटील यांनी तर सुत्रसंचलन सचिव दिनेश बाविस्कर यांनी केले. यावेळी प्रेमकुमार आहिरे,शाहिर  विजय वाघ, तालुका अध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव दिनेश बाविस्कर, कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार शिंपी , संपर्क प्रमुख  विश्राम तेले, वनश्री दशरथ पाटील, संघटक कांतिलाल पाटील, महेंद्र राजपुत, सर्पमित्र कुशल अग्रवाल, परेश पालिवाल, किरण कंरदीकर आदींसह निसर्ग मित्र समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content