आम्हाला विश्‍वासात घेऊनच भुसावळच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा- अनिल पाटील

0

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेत परिसरातील गावांना विश्‍वासात घेऊन मगच याला वेग द्यावा अशी मागणी साकेगावचे सरपंच अनिल पाटील यांनी केली आहे.

भुसावळ नगरपालिका हद्दवाढीचे प्रकरण सध्या खूप तापले आहे. यात साकेगाव आणि कंडारीसह परिसरातील काही गावांना शहरी हद्दीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी याला कडाडून विरोध केला आहे. या अनुषंगाने आता साकेगावचे सरपंच अनिल पाटील यांनी नवीन मागणी केली आहे. ते म्हणाले की, साकेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणार्‍या शहरी भागातील नागरिकांचे मतदान आधीच भुसावळ नगरपालिकेत आहे. या भागातील लोक हे नगरपालिकेसाठी मतदान करतात. यामुळे हद्दवाढीचा प्रश्‍न उदभवत नाही. मात्र ही प्रक्रिया सुरू करायची असल्यास आम्हाला विश्‍वासात घ्यावे अशी मागणी त्यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजसोबत बोलतांना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Protected Content