कांद्याच्या महागाईचा आमच्यावर फार परिणाम नाही : निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman 2 770x433

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माझ्या कुटुंबात कांदा व लसणेचा वापर फार केला जात नाही. त्यामुळे कांद्याच्या महागाईचा आमच्यावर फार परिणाम झालेला नाही, असे संतापजनक वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या महागाईवरून देशभरात वातावरण तापलेले असताना संसदेत केले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्र्यांना बुडीत कर्जे आणि कांद्याच्या घटलेल्या उत्पादनामुळं शेतकऱ्यांपुढे उभ्या राहिलेल्या समस्येबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना कांदे खाण्याविषयीच्या स्वत:च्या सवयींबद्दल सांगितले. मी अशा कुटुंबातून आलेय, जिथे कांद्याला फार महत्त्व दिले जात नाही. कांदा आणि लसूण फार खात नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही, कांद्याच्या महागाईचा आमच्यावर फार परिणाम झालेला नाही,’ असे सीतारामन म्हणाल्या.

Protected Content