संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांचा नागरी सत्कार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ छत्रपती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांचा सर्वपक्षीय व सर्व समाज बांधवांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर येथे जात असतांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी विचारांचे प्रचारक, ‘अहत ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा’ या उद्योजक बनविण्याच्या अभिनव संकल्पनेचे जनक शिवश्री प्रविणदादा गायकवाड यांचा धरणगाव शहर व तालुक्याचा वतीने सर्वपक्षीय तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
प्रविणदादा यांच्या आगमन प्रसंगी फुलांची उधळण व ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करून स्वागत केले. यावेळी ज्योती पाटील व माधुरी पाटील यांनी प्रविण दादा गायकवाड, प्रतिभाताई शिंदे आणि गुलाबराव देवकर यांचे औक्षण केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते कुळवाडीभूषण, मानव प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुध्दांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. नागरी सत्कार करण्यामागील हेतू विषद करताना लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, प्रविणदादा गायकवाड यांनी आजपर्यंत शैक्षणिक, व्यावसायिक, सांस्कृतिक व संत महापुरुषांच्या सामाजिक चळवळीत विशेष उल्लेखनीय कामगिरी केली असून व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे.

प्रविणदादा यांचे सामाजिक कार्य प्रभावी राहिले असून त्यांनी ‘अहत ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा’ या संकल्पनेच्या माध्यमातून समाजासमोर एक मोठा आदर्श उभा केला आहे त्यांच्या अभ्यासपूर्ण लिखाणातून व भाषणातून अनेक नवनवीन पैलू दिसून येतात म्हणून त्यांच्या कार्याच्या उचित गौरव व्हावा म्हणून आम्ही नागरी सत्कार केला. असे श्री पाटील यांनी सांगितले. यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी मनोगतात सांगितले की, युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता छोटा मोठा उद्योग करावा असे आवाहन केले व माझा नागरी सन्मान केला याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तद्नंतर कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

शिवश्री प्रविणदादांच्या नागरी सत्कार प्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, तालुकाध्यक्ष धनराज माळी, इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे सचिव सी.के.पाटील, कुणबी पाटील समाजाध्यक्ष भिमराज पाटील, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, पत्रकार संघाचे राजेंद्र वाघ, नूतन सोसायटीचे कैलास मराठे, माजी नगरसेवक भागवत चौधरी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगर अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मयूर चौधरी, जळगाव तालुकाध्यक्ष प्रफुल पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष संभाजी देसले, अँड. कैलास मराठे, धिरेंद्र पुरभे, बुधा मराठे, जगदीश मराठे, सिताराम मराठे, नवनीत पवार, उत्तम मराठे, किशोर पवार, हेमंत माळी, एम. एच. पाटील, किशोर पाटील, वाय. जी. पाटील, मोहन पाटील, किरण अग्निहोत्री, पत्रकार अविनाश बाविस्कर, पी. डी. पाटील, आकाश बिवाल, गोरख देशमुख, निलेश पवार, दिलीप धनगर, महेश पाटील, राजेंद्र महाले, महेश्वर पाटील, गोपाल पाटील, जितेंद्र पाटील, सुमित मराठे, गौरव पाटील, राजू पाटील, मयूर मोरावकर, दिनेश भदाणे, प्रफुल पवार, विक्रम पाटील, विजय पाटील, राहुल माळी, पंकज महाजन, मयूर भामरे, प्रमोद कुंभार, कपिल पाटील, अविनाश पाटील, शंतनू जगताप, राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content