शिवाजीनगर येथे कोरोना योद्धयांचा सत्कार (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीचे संकट असतांनाही जिवाची पर्वा न करता शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना अखंडितपणे पाणीपुरवठा करणाऱ्या तसेच आपत्कालीन परिस्थितीही तत्परतेने सेवा देणाऱ्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा माॅं शांता शृंगी बहुउद्देशीय संस्था व शिवाजीनगर शिवसेना शाखेकडून शाल, श्रीफळ, मास्क व सॅनिटायझर देऊन सत्कार करण्यात आला.

शिवाजीनगर येथील मनपा आयुक्त निवासस्थानाजवळ पाणीपुरवठा व अग्निशमन विभागाच्या दालनात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीनगर येथील शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांनी केले. एवढी कार्यक्रमास विशेष उपस्थित असलेले भारत ससाणे यांनी संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाविषाणू भारतातही कहर माजवला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. अशा कठीण परिस्थितीत जीवाची बाजी लावून नागरिकांना अखंड सेवा देणारे मनपाचे पाणीपुरवठा व अग्निशमन विभागातील कर्मचारी खरे कोरोना योद्धा आहेत. सांगून कर्मचार्‍यांचे कौतुक केले. कार्यक्रमात शिवाजीनगर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुनील तायडे, मुकादम ज्ञानेश्वर सपकाळे, राजेंद्र सोनार, सलीम पठाण, योगेश रोकडे, उमाकांत चव्हाण, कांतीलाल सपकाळे, चंद्रकांत गायकवाड तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी शशिकांत बारी, विभाग प्रमुख फायर मॅन नासिर शेख, नामदेव पोळ, बाळू पोळ, मदन दराडे, रवींद्र सपकाळे यांना शाल श्रीफळ, मास्क व सॅनिटायझर देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास माॅं शांता शृंगी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष नामदेव पाटील, उपाध्यक्षा योगिता पुरूषोत्तम तिवारी, सचिव सिताराम ओंकारलाल पुरोहित, खजिनदार गोपाल बन्सीलाल व्यास, शुभम जोशी, अनुप तिवारी, मुकेश उपाध्ये, विजुभाऊ पिंगळे, पुरुषोत्तमा तिवारी, मोहन (शेरा) जाधव, शिवाजीनगर शिवसेना शाखेचे किरण ठाकूर, संजय चित्ते आदि उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/730232480883502/

Protected Content