पिंप्रीत कोरोनाचा शिरकाव : गावासह बाजारपेठ मंगळवारपर्यंत राहणार बंद

 

पिंप्री खुर्द ता. धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून कालपर्यंत सुरक्षित असलेल्या पिंप्रीत आज कोरोनाच्या पहिला रूग्ण आढळला. त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून त्या व्यक्तींना आज सकाळीच धरणगाव सेंटरला पाठविण्यात आले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील त्यासंशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणी अहवाल येई पर्यंत म्हणजेच मंगळवार दि. १४ जुलैपर्यंत पिंप्री गावासह बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णय वरिष्ठांच्या आदेशान्वये ग्रामंपचायत सह व्यापारी व ग्रामंस्थ बांधवांनी घेतला आहे. रुग्ण राहत असलेली गल्ली व त्या परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने सकाळीच हायड्रोक्लोराईडची फवारणी करुन तो पारिसर बंदिस्त करण्यात आला आहे. परिसरातील गावांमध्ये देखिल कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराच्या ससंर्ग रोखण्यासाठी गावातील व्यापारी व लहान- मोठ्या सर्वच व्यावसायिक बांधव , ग्रामस्थांनी व खास करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या जेष्ठ, श्रेष्ठ मंडळी व युवक मित्रांनी या बंद ला सहकार्य करत सुरक्षित रहावे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असा इशारा ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच योगिता विजय सुर्यवंशी यांनी दिला आहे.

Protected Content